कामशेत : घरच्यांचा विरोध झुगारून आंतरजातीय विवाह केल्याने मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या लहान भावाचे अपहरण केल्याचा प्रकार कामशेत येथे घडला. मात्र पोलिसांनी मोठया हुशारीने अवघ्या पाच तासात अपहरण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळत अपहरण झालेल्या १८ वर्षीय मुलाची सुटका केली आहे.
सोमवारी (दि २९) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शुभम मंगेश भोसले (वय २४, रा.कामशेत) याने कामशेत पोलिस ठाण्यात येऊन माहिती दिली की ते मूळचे सोलापूर येथील असून त्याचा लहान भाऊ वैभव मंगेश भोसले यांनी गेल्या महिन्यात याचे कॉलेजमधील मुलीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे.
मुलीचे नातेवाईकांची या प्रेम विवाहाला मान्यता नसल्याने ते वारंवार मुलीला घरी परत ये असा आग्रह करत होते परंतु मुलीने त्यास नकार दिला होता यामुळे सोमवारी( दि.२९) सायंकाळी ७ वा. मुलीचे नातेवाईक दोन फोर व्हीलर घेऊन कामशेत येथे येऊन त्यांनी मुलीचा दिर अभय मंगेश भोसले(वय १८ वर्षे) याचे अपहरण करून लोणावळा दिशेने पळून गेले व जाताना त्यास आमच्या मुलीला परत पाठव नाही तर तुझा भावास आज जिवंत सोडणार नाही
असे म्हणून त्यास मारहाण करून त्याचा मित्र जय मिरकुटे त्याचा मोबाईल घेऊन ते लोणावळ्याच्या दिशेने गेल्याचे सांगितले या फिर्यादी नुसार कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सदर घटनेची माहिती घेऊन तात्काळ पोलीस उप निरीक्षक सुरेखा शिंदे व स्टाफ सर्व पोलिस स्टेशनचे वाहनाने घटनास्थळाकडे धाव घेऊन त्या दिशेने पाठलाग सुरू केला या घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठांना देऊन वरसोली टोलनाक्यावर अपहरण करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.
सहाय्यक पोलिस अधिक्षक नवनीत कावत यांनी लोणावळा विभागातील सर्व पोलीस स्टेशनची पथके तात्काळ शोधण्यासाठी रवाना केली घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी कडून मारुती स्विफ्ट डिझायर कार (क्र. केए २९ एन १०९३) या वाहनातून आरोपींनी पलायन केल्याची माहिती सर्वांना कळवली त्या अनुषंगाने वरसोली टोल नाका येथे पोलीस निरीक्षक लवटे व त्यांच्या पथकाने वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता अपहरणकर्त्यांनी टोल नाक्यावरील ब्यारिकेट उडवून न थांबता लोणावळा दिशेने पळून गेले पोलीस उपनिरीक्षक लवटे यांनी त्यांच्या पथकाने सदर वाहनाचा पाठलाग केला मात्र पुढे गेल्यावर अपहरणकर्त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन त्यांची गाडी लोणावळ्यातील तुंगार्ली परिसरात अज्ञात ठिकाणी पोबारा केला .
यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टीवाय मुजावर यांनी तुंगार्ली परिसरात शोधमोहीम सुरू केली अखेर रात्री १० वाजल्याच्या सुमारास अपहरणकर्ते त्यांचे वाहनासह आरोपी अल्ताफ शेख ( वय २४ वर्ष रा. शिरपूर ता. मोहोळ जि. सोलापूर), सिद्धराम बिरादार (वय २३, रा. गोविंदपुर जि. बिजापूर कर्नाटक), शरमतरबेज मुल्ला (वय २३, विजापूर, कर्नाटक) यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे चौकशी केली असता अभय भोसले याला त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या वाहनाने त्यांच्या तीन साथीदार पुणे येथून घेऊन गेल्याचे सांगितले.या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंगडे यांनी विमाननगर पुणे येथे पथकासह जाऊन आरोपींचे संपर्कातील व्यक्तीचा शोध घेऊन अपहरण झालेला मुलगा अभय भोसले यास ताब्यात घेतले आहे.