टाकवे बुद्रुक:
उच्च शिक्षण घेऊन गलेलठ्ठ पगाराची नोकरी,आपण आणि आपले कुटुंब या चौकटीत बरचे आडकलेले दिसतील,या या चौकटीच्या बाहेर पडून सेंद्रीय शेती कसदार धान्य आणि फळ पिकवण्याचा चंग आंदर मावळातील मेकॅनिकल इंजिनिअरने घेतला आहे.
अजित उल्हास शिंदे रा. इंगळुन ता.मावळ जि.पुणे असे या मेकॅनिकल इंजिनिअरचे नाव.
लहान पणापासुन घरच्यांना असे वाटत होते की,मुलाने चांगले शिक्षण घेऊन इंजिनीअर किंवा डाॅक्टर व्हावा. कोठेतरी चांगल्या कंपनीत कामाला लागावा. त्याप्रमाने सन २०१६ माझे सर्व शिक्षण पुर्ण होऊन तो इंजिनीअर झाला. तसेच नोकरीला पण लागला, ३ वर्षे नोकरी केली परंतु मनांत कुठेतरी वाटत होते की नुकत्याच नोकरीवर अवलंबुन न राहता काहीतरी दुसरा उत्पन्नीचा मार्ग मिळवा, म्हणून केळीची सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला व १ एकर क्षेत्रात केळींची लागवड केली. जवळपास ७० ते ८० हजार रुपयांचे भांडवल गुंतवले. कामावरून घरी आल्यानंतर केळींच्या झाडांची मशागत करून लहान असलेली केळींची रोपे मोठी केली. कुटुंबिय समवेत त्याने

जवळपास ९ ते १० महीने खुप अतोनात मेहनत केली. ती उत्पन्नाच्या उंबरठयावर आणली. कुठेतरी मनांत वाटत होतं की आता आपल्याला आपल्या मेहनतीच फळ भेटणार तेवढ्यात चक्रीवादळाचे मोठे संकट आले. आणी खुप मोठा घात झाला. भर चक्रीवादळात आम्ही सर्वांनी झाडे वाचविण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला यश नाही आले. जवळपास ८० % झाडे आमच्या डोळ्यांसमोर भुईसपाट झाली. अक्षरशा डोळ्यातुन अश्रु बाहेर आले.
परंतु तेथे न खचुन जाता मनांत एक निश्चय केला की निदान जेवढे भांडवल गुंतवले आहे तेवढे तरी काढण्याचा प्रयत्न करुया.आणी ते करुन दाखवले.
मग कुठेतरी एक शेताची आवड निर्माण झाली. त्यात मामा रोशन पिंगळे यांनी गुलाबाच्या शेतीबद्दल माहिती दिली, ती मला पटली .परंतु त्यासाठी लागणारे भांडवल अतिशय मोठे होते. मनांत ठरवले की पुन्हा काहीतरी करण्याची संधी मिळाली त्यांच सोनं करुन दाखवायचं, नशिबाने तसेच घरच्यांच्या मदतीने येवढे मोठे भांडवल पण उभे झाले व २८ गुंठ्यामधे पाॅलीहाऊस उभे केलं.आणि पुन्हा एकदा मेहनत करायचं ठरवले. त्यातुंन चांगले उत्पन्न मिळायला सुरुवात झाली. आता हा तरूण सेंद्रिय शेती बरोबर गुलाबाची शेतीही करतो,अशा कष्ट करणाऱ्याला हाताला दाम मिळाले पाहिजे आणि पंखांना बळ.

error: Content is protected !!