पिंपरी:
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस मधून व मावळ तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांची निवड निवडणूक निरिक्षक पदावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कडून करण्यात आली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी पृथ्वीराज साठे यांच्या मार्गदर्शानाखाली युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची टीम आसाममध्ये 22 मार्च पासून कार्यरत झाली आहे.
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव व चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे यांची तसेच मावळातील तळेगाव शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाळुंज व शरद कदम यांचीही निवड आसाम राज्यातील विधानसभा निवडणूक निरिक्षक पदावर करण्यात आली आहे.
आसाम राज्यातील ग्वालपाडा व ठूबरी या जिल्ह्यातील ग्वालपाडा पूर्व, ग्वालपाडा पश्चिम, दूधनोई, जलेश्वर, साऊथ सालामारा व गोलकगंज या सहा विधानसभा मतदारसंघात हे कार्यकर्ते प्रचारात आघाडी संघटनाची यंत्रणा, प्रत्यक्ष नागरी बैठका, बूथ व्यवस्थापन, सामाजिक समन्वय तसेच शहरी व ग्रामीण मतदारांशी समन्वय साधण्याचे काम करत आहेत.

error: Content is protected !!