नवलाखउंब्रे:
नेतृत्व गुणांचा विकास हा नेहमी खेळाच्या मैदानावर अधिक वाढतो, आपल्याला मैदानी व मर्दानी खेळाची परंपरा आहे. ही परंपरा कायम राखीत सुदृढ शरीर संपदा जोपासण्यासाठी युवकांनी मैदानी खेळाची आवड जोपासावी असे आवाहन राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी असवले यांनी केले. नवलाखउंब्रेतील जय हनुमान मित्र मंडळ व समृद्धी ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शिवाजी असवले बोलत होते.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पंचक्रोशीतील व्हॉलीबॉल संघाने या स्पर्धेत भाग घेतला होता. 

यावेळी उद्योजक नवनाथ पडवळ , सरपंच मोहन घोलप,सातेचे माजी सरपंच संदीप आगळमे,माजी उपसरपंच भिकाजी भागवत, माजी उपसरपंच रविभाऊ कडलक, सरपंच पांडुरंग कोयते, माजी उपसरपंच देविदास भांगरे, माजी ग्रामपंचायत सदस्य धोंडिबा भागवत,राजूभाऊ कडलक, उपसरपंच मयूर नरवडे,मनोहर गायकवाड,देवदास भांगरे, उपस्थित होते.
प्रथम क्रमांक नवलाख उंब्रे संघाने तर द्वितीय क्रमांक कामशेत संघाने पटकाविला. विजेत्या संघाना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
महेंद्र कडलक, मनोहर गायकवाड ,समीर कडलक, रवि कोयते, मयुर कडलक, अमोल कोयते, महेश कडलक, ओकार कोयते, आकाश गायकवाड, सुरज कडलक, अक्षय कोयते, सचिन कडलक, मदन शिवेकर, उददे्श गायकवाड यांनी स्पर्धेचे आयोजन केले. सूत्रसंचालन रविभाऊ कडलक यांनी केले. 

error: Content is protected !!