वडगाव मावळ :
मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शंकरराव शेळके यांनी रविवारी पत्रकार परिषदेत मावळ तालुक्यातील विकासाबाबत ‘लेखाजोखा विकासकामांचा ‘ मांडला.मावळ तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी ७११ कोटी २३लाख रुपये मंजूर झाले असल्याचे आमदार सुनिल शेळके यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
तर प्रस्तावित कामांसाठी दीड हजार कोटी रुपयांच्या विकासनिधीची मागणी महाविकास आघाडी सरकार कडे केली असून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार शेळके यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, कृषी व पशुसंवर्धनचे सभापती बाबूराव वायकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे, वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, दिपक हुलावळे, जीवन गायकवाड, कृष्णा दाभोळे,पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत, राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्ष सुवर्णा राऊत , युवक अध्यक्ष सुनिल दाभाडे यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार सुनिल शेळके म्हणाले,”
अर्थसंकल्पीय वर्षे २०२०-२१ मध्ये ४८ कोटी २६ लाख, अर्थसंकल्पीय वर्षे २०२१-२२ मध्ये ८५ कोटी ०६ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या शिवाय वैशिष्टय़पूर्ण योजनेतून तळेगाव नगरपरिषदेसाठी ३कोटी,लोणावळा नगरपरिषदेसाठी २कोटी,वडगाव व देहू नगरपंचायत साठी प्रत्येकी १कोटी असे ८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

पवनानदीवर गहुंजे,शिवणे,कडधे,थूगाव,बेबडओहळ,गोडुंब्रे येथे,इंद्राणी नदीवर बुधवडी,सांगिसे,पिंपळोली,टाकवे बुद्रुक,राजपुरी,नाणे,देहू,वाडिवळे कालव्यातून बंदिस्त जलवाहिनी या कामासाठी ६३ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. केंद्रीय रेल्वे प्रशासन व राज्यशासनाच्या निधीतून कान्हे रेल्वे उड्डाणपूल,मळवली रेल्वे उड्डाणपूलासाठी ११४ कोटी, जिल्हा नियोजन समितीतून ७१ कोटी ७१ लाख रुपये, आमदार स्थानिक विकास निधी २०१९ -२० मधील २३ लाख,२०२० -२१ साठी ४ कोटी ५० लाख,आमदार डोंगरी विकास निधीतून १कोटी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून १० कोटी ७२ लाख,महाराष्ट्र जीवन प्रादेशिक पाणी योजनेसाठी ४० कोटी ४१ लाख, वाडिवळे येथे जलवाहतूकीसाठी ५ कोटी ८५ लाख,गौण खनिज निधीतून २कोटी ५० लाख,२५१५ ग्रामविकास निधी ४ कोटी १० लाख,३०५४ राज्य शासनाचा निधी ६० लाख,पीएमआरडीए तून ६ कोटी,आदिवासी विकास विभाग ठक्कर बाप्पा निधी ८२ लाख ५० हजार,लोणावळ्यात जिल्हा रुग्णालय इमारत ४० कोटी ९४ लाख,पशुसंवर्धन फिरता दवाखाना ३५ लाख,सामाजिक न्याय विभाग दलित वस्ती विकास कामांसाठी २कोटी,कान्हेतील उपजिल्हा रुग्णालयासाठी ३९ कोटी ७० लाख,घुसळखांब रस्ता २५ कोटी,भीमाशंकर रस्ता भूसंपादन मावळ तालुका साठी ५ कोटी,तळेगाव चाकण रस्ता इंदोरी हद्दीपर्यत ६ कोटी,

टाकवे बुद्रुक येथे इंद्रायणी नदीवरील पुलासाठी ९ कोटी,कालेकाॅलनी आरोग्य केंद्र १कोटी ८०लाख,तळेगाव दाभाडे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान दुरूस्ती व डागडुजी १कोटी १२ लाख, केंद्रीय रस्ते विकास निधीतून वडगाव अंतर्गत रस्ता ४ कोटी,देहूरोड धम्मभूमी सुशोभीकरण ५० लाख,वडगाव सत्र न्यायालय दुरूस्ती व सुशोभीकरण ६५ लाख,लोणावळ्यात पोलीस स्टेशन इमारतीसाठी जागा १४ कोटी,देहूरोड छावणी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल मध्ये सोयी सुविधेसाठी १कोटी,सुदुंबरे संत जगनाडे महाराज मंदिर परिसरात भक्त बांधणे ३०लाख,दोन रुग्णवाहिकेसाठी ३४ लाख असा ७११ कोटी २३लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून ही कामे मार्गी लागतील.

याशिवाय तळेगाव चाकण रस्ता काँक्रिटीकरण, एकवीरा देवी मंदिर व लेणी संवर्धन,जलजीवन मिशन,जून्या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी उड्डाणपूल,ग़ामीण भागातील भौतिक विकास,शाळा व अंगणवाडी दुरुस्ती,कान्हे टाकवे भोयरे रस्ता,टायगर पाॅईट येथे स्कायवॉक,वडेश्वर आश्रमशाळा नवीन इमारत,वडगाव पाणी पुरवठा योजना,तळेगाव शहरातील अंतर्गत रस्ते,तळेगाव मागासवर्गीय मुलीचे वस्तीगृह,मुंढावरे,नाणे टाकवे जूना रस्ता,नाट्यगृह,क्रीडासंकुल,रस्ते,रायवूड पार्कचा विकास,काले गावाजवळ पूल,लोणावळा कोळवण,आंबी ते आंबळे,कळकराई हे रस्ते,अनुसूचित मुलांचे वस्तीगृह,पोलीस वसाहत,देहू नगरपरिषद इमारत,लोणावळ्यात पोलीस स्टेशन,एसटी डेपो दुरुस्ती व सुशोभिकरण,गरजेच्या ठिकाणी पूल,धरणग्रस्तांचे प्रश्न,पर्यटन विकास,पाणंद रस्ते,शासन आपल्या दारी या सारखी अनेक कामे मार्गी लावण्यासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपयाचा विकास निधीची मागणी महाविकास आघाडी सरकार कडे केली असून त्याचा पाठपुरावा करीत राहणार असल्याचे आमदार शेळके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विरोधकांनी राजकीय मतभेदाचे जोडे बाजूला ठेवून तालुक्याच्या विकास साठी साथ द्यावी असे आवाहन करीत तळेगाव नगरपरिषदेतून सहकार्य मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नावर रोकठोक भाष्य करीत आमदार शेळके यांनी आपली भूमिका मांडली.गोवित्री विविध कार्यकारी सहकारी संस्थेतील बनावट मतदार यादी प्रकरणात अटकेत असलेले जिल्हा बॅकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या अटक प्रकरणात आपला काडीचाही सबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!