टाकवे बुद्रुक:
व्यवसायातून आर्थिक उन्नती साधता येते, अनेक लहानमोठ्या व्यवसायातून रोजगाराची निर्मिती होते हे वास्तव्य स्वीकारून तरुणांनी व्यवसायात स्वतःला झोकून द्या असे आवाहन मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शिवाजीराव असवले यांनी केली.
आंदर मावळातील कल्हाट भोयरे फाटा येथे गुडलक हेअर कटिंग सलूनचे उद्घाटन शिवाजीराव असवले यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी ते बोलत होते. कल्हाटच्या सोमनाथ आगिवले व भाऊ करवंदे या दोन तरूणाने येथे सलून सुरू केले असून ग्रामीण भागातील तरूण पिढीला यापुढे दाढी केस कापण्यासाठी पुणे मुंबई शहरात जाण्याची गरज पडणार नाही या हेतूने सर्वसूविधा युक्त हे अद्यावत सलून सुरू केले असल्याचे आगिवले व करवंदे यांनी सांगितले.
सोमनाथ आगिवले व भाऊ करवंदे यांनी सुरू केलेल्या दुकानात शहरातील कारागीर काम करीत असून त्यामुळे ग़ामीण भागातील तरूण पिढीला स्टायलिश केस कापता येणार आहे.

उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादीचे संघटनमंत्री नारायण ठाकर, सरपंच बळीराम भोईरकर,माळवाडीचे उपसरपंच सुनिल भोंगाडे, उद्योजक नारायण मालपोटे, राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष अनिल जाधव, सरपंच बबूशा भांगरे, पोलीस पाटील मंगेश आडिवळे, ग्रामपंचायत गणेश भांगरे, ग्रामपंचायत सदस्य बुधाजी जागेश्वर, ,राष्ट्रवादी उपाध्यक्ष दिगंबर आगिवले, गोरख पिंगळे,बाळासाहेब थरकुडे,रोहीदास लखिमले,दादाभाऊ कोयते,शिवाजी करवंदे,भरत करवंदे,दशरथ यादव, संतोष करवंदे, दत्ता पवार,गुलाब भोईरकर,गोपाळ भोईरकर उपस्थित होते. सुत्रसंचालन गोपाळ पवळे यांनी केले. दिगंबर आगिवले यांनी आभार मानले. 
error: Content is protected !!