वडगाव मावळ:
ग्रामपंचायत भोयरे व हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेमार्फत महिलांकरिता व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. महिला सबलीकरण व सक्षमीकरण हा या प्रशिक्षणा मागचा उद्देश होता.
भोयरे येथे ग्रामपंचायत भोयरे व हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेमार्फत महिलांकरिता व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणात महिला व तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध कसा होईल यासाठी वेगवेगळ्या व्यवसायानची महीती दिली घरगुती साबण बनवणे, धुप बनवणे, केक बनवणे, नाचणीचे पापड, ज्वारी चे पापड, तांदळाचे पापड बनवणे अश्या विविध प्रकारच्या व्यवसाया विषयी माहिती देण्यात आली. 

तसेच महिला सबलीकरण व सक्षमीकरणवर भर देण्यात आला. सदर प्रशिक्षण यशदा संस्थेचे प्रशिक्षक मा.श्री. धूपडे सर यांनी प्रशिक्षण दिले. सदर प्रशिक्षण वेळी ग्रामपंचायत भोयरे सरपंच बळीराम भोईरकर, ग्रामसेविका प्रमिला सूळके तसेच हॅन्ड इन हॅन्ड संस्थेचे मोसीन शेख़ , सारिका शिंदे , गौरी करवंदे व ग्रामपंचायत सदस्य महिला व ग्रामस्थ हजर होते.
error: Content is protected !!