पुणे:
सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे, पुणे जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून होळी धुलीवंदन, रंगपंचमी हे सण सार्वजनिकरित्या साजरी करू नये असे आदेश
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
कोरोना महामारीस एक वर्ष पुर्ण झाले असुन सद्यस्थितीत
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे
जिल्हयातील शहरी तसेच ग्रामीण भागात होळी,
धुलीवंदन, रंगपंचमी हे सण मोठ्या उत्साहात साजरे
करण्याची परंपरा आहे.या सण समारंभात गर्दीचे प्रमाण वाढून कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू शकतो. यामुळे सद्यस्थिती प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे यावर्षी सुद्धा होळी,धूलिवंदन,रंगपंचमी साधेपणात साजरी करावी लागणार आहे. सामाजिक जबाबदारी स्वीकारून कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणुन रविवार (दि.२८) व सोमवार (दि.२९) रोजी होळी,धुलीवंदन, रंगपंचमी उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे,सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माणसंस्थांमधील मोकळया जागा आदी ठिकाणी साजरेकरण्यास मनाई करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी देशमुख यांनी परिपत्रकाद्वारे आदेशात म्हटले आहे.

error: Content is protected !!