पुणे

पुण्यात आजतरी लॉकडाऊन नाही, पण २ एप्रिलपर्यंत परिस्थिती सुधारली नाही तर कडक
निर्बंध लावण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या.अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत
घेण्यात आला. ३० एप्रिलपर्यंत.शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत..पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या.वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा.निर्णय घेण्यात आला. कामगारमंत्री.दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.यांच्यासह आमदार उपस्थित होते. कोरोनाची दुसरी साथ रोखायची असेल तर लॉकडाऊन करणे गरजेचे आहे, असे वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासनास वाटत आहे. मात्र १ एप्रिलपर्यंत थांबण्याचा निर्णय सर्वानी एकमताने घेण्यात आला.

 परिस्थिती सुधारली नाही तर कडक निर्बंध लावण्यात
येतील, असे पवार यांनी सांगितले.सर्व राजकीय कार्यक्रम बंद असून .निर्बंध कायम राहणार आहेत. चित्रपटगृहे ५०
टक्के क्षमतेने सुरू राहतील, लॉन किंवा मंगल
कार्यालयात ५० जणांच्या उपस्थितीतच विवाह समारंभ करण्यास परवानगी देण्यात.आली आहे.खासगी रुग्णालयातील ५० टक्के बेड ताब्यात घेण्यात येणार आहेत.लॉकडाऊन लावला तर गोरगरिबांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ द्यायचा नाही म्हणून लोकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. परिस्थिती अशीच राहिली, तर कठोर निर्णय घेण्याची वेळ
येईल. नियम लोकांना पाळायला हवेत. ते जर पाळले नाहीत, तर येत्या २ एप्रिलला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल.

●हे नियम आहेत
•खासगी रुग्णालयात ५० टक्के बेड कोरोनासाठी राखीव
•१ तारखेपासून लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम बंद.करावेत.
•शाळा-महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद
• मॉल, चित्रपटगृहांसाठी ५० टक्केच उपस्थिती
•सार्वजनिक बस वाहतूक सुरू राहील.
•लग्नसमारंभात ५० पेक्षा अधिक संख्या नको •अंत्यविधीसाठी २० जणांना परवानगी
•सार्वजनिक उद्याने, बागबगीचे फक्त सकाळीच सुरु 

error: Content is protected !!