वडगाव मावळ:
तहसीलदार साहेब, मावळ तालुक्यातील रेशनिंग पुरवठा विभागातील एका कर्मचाऱ्यांकडून पोलीस पाटील
पदाबाबतअपमानजनक अपशब्द वापरल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आपल्या कार्यालयात आम्ही उपोषणाला बसू असा इशारा मावळ तालुका पोलीस पाटील संघटनेने दिला, या इशाऱ्याची दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिल्याचे पोलीस पाटील संघटनेने सांगितले.
गुरूवार दिनाक२५/०३/२०२१ रोजी मावळ तालुका पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष श्री संदीप आडकर हे पुरवठा विभागात त्यांच्या खाजगी कामासाठी गेले असता पुरवठा विभागातील

 एका कर्मचारी यांनी या कार्यालायत यायचे नाही असे म्हणत शिवीगाळ केली, अंगावर धावून येणे , तुझी लायकी काय पाटलांची आमच्या समोर अशी भाषा वापरली आहे.त्याच दरम्यान एक व्यक्तीला आवाज गेल्याने पाटील काय झाले आहे, असेकार्यालायत येऊन विचारले असता हा पाटील आहे हे पाटील काय असे म्हणत अपशब्द वापरले. आणि पोलीस पाटील पदाची अवमान केला असून एक लिपिक यांनी अशा प्रकारे अपशब्द वापरणे हे अत्यंत अपमानस्पद असून या कर्मचारी बद्दल यापूर्वी देखील अनेक नागरिकांनी तक्रार दिलेलीआहे , हे पोलीस पाटील संघटनेने तहसीलदार यांना निवेदनात देऊन त्याच्या लक्षात आणून दिले.
यापूर्वी नागरिकांनी तक्रारी करूनही देखील कारवाई न केल्याने हा कर्मचारी दादगिरी करत आहे.या कर्मचारी याला वरिष्ठ अधिकारी कायम पाठीशी घालत आले आहे. ही भूमिका संशय व्यक्त करणारी आहे असा संताप पोलीस पाटील संघनटने केला. सदर घटनेची माहिती आमदार सुनिल शेळके साहेब यांना फोन करून कळविली असता , आमदार शेळके यांचे स्वीय सहायक आले असता त्याच्या समोर देखील संबंधित कर्मचारी पोलीस पाटील यांना दादागिरी आणि अपमानस्पद भाषा वापरलीआहे .

या कर्मचाऱ्यांकडून अनेक लोकांसमोर अपशब्द शब्द वापरून पोलीस पाटील पदाची प्रतिष्टा मलीन केल्याने अशा मुजोर कर्मचारीयांचे वर ताबडतोब कारवाई करून निलंबन करण्यात यावे.याच्यावर तत्काळ कारवाई न करता पाठीशी घातल्यास तालुका संघटना आपल्या कार्यालयात आंदोलन आणि उपोषण करणर आहोत असा इशाराच पोलीस पाटील संघटनने केला होता. 

पोलीस संघटनेचे अध्यक्ष श्री.लक्ष्मणराव शितोळे ,सचिव श्री.शांताराम सातकर कार्यकारी अध्यक्ष, श्री. गुलाबराव आंबेकर कार्याध्यक्ष: सौ. अरूणा काटकर उपाध्यक्ष: श्री. अतुल असवले श्री. संदिप आडकर श्री. राहुल आंबेकर.श्री. श्रीकांत वाळुजकर सरचिटणीस: श्री. राहुल घारे खजिनदार: श्री. अनिल पडवळ सदस्य: श्री. महेश चौधरी श्री. प्रशांत वाळुजकर श्री. शरद पवार श्री. सागर घाडगे सौ. ज्योती मोरे सौ. रोहिणी चोपडे सौ. दुर्गा घारे सौ. राजश्री कचरे यांनी तहसीलदारांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. तहसीलदार साहेबानी आश्वासन दिले. 
error: Content is protected !!