टाकवे बुद्रुक:
टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीची नुकतीच ग्रामसभा संपन्न झाली.या ग्रामसभेत प्रशासनाला धारेवर धरत टाकवे गावाला अधिक फंड मिळवण्यासाठी सर्व सदस्यांनी मिळुन शक्य होईल ,त्या पातळीवर पाठपुरावा करुन अधिक फंड मिळावा यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी युवकचे माजी  काार्याध्यक्ष  शिवाजी असवले यांनी केली.
ग्रामसभेत मुख्यत्वे २०२१/२२ या वर्षाचा १५ व्या वित्त आयोगाचा आराखडा तयार करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये विषेशतः कचरा व्यवस्थापन, शौचालय या विषयावर सखोल चर्चा झाली. कचरा व्यवस्थापन करण्यासाठी जागेची मागणी करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. तीन एकर जागेची मागणी करण्यात येणार आहे.तसेच सार्वजनिक शौचालये ची अडचण दुर करण्यासाठी फिरते शौचालय ग्रामपंचायत खरेदी करणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली .

निवडणुक झाल्यानंतरची ही पहिलीच ग्रामसभा असल्याने ग्रामस्थांच्या सर्व मागण्या सरपंच उपसरपंच व सदस्यांनी समजून घेतल्या, विकासाबाबत येत्या काळात आग्रही भुमिका घेऊ असे आश्वासन ग्रामसभेत देण्यात आले .यावेळी सरपंच भुषण असवले, उपसरपंच सतु दगडे ,सदस्य सोमनाथ असवले ,ऋषीनाथ असवले ,परशुराम मालपोटे ,सुवर्णा असवले, प्रिया मालपोटे, संध्या असवले ,ज्योती आबेकर , जिजाबाई गायकवाड ,प्रतिक्षा जाधव, पोलीस पाटील अतुल असवले, ग्रामविकास अधिकारी सुभाष बांगर,राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष शिवाजीराव असवले, माजी सरपंच बाळासाहेब कोकाटे, माजी उपसरपंच तानाजी असवले, चेअरमन मारुती असवले,उद्योजक शेखर मालपोटे, सचिव राजु शिंदे, मुख्याध्यापक शिवाजी जरग,भुषण जाधव ,संजय क्षिरसागर आदीजण उपस्थितीत होते.

शिवाजी असवले म्हणाले, मावळचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विकासनिधी मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. गावचे नागरीकरण वाढत आहेत, त्या दृष्टीने विकास आराखडा करण्यावर प्राधान्य देण्यात यावे. 

error: Content is protected !!