● दत्तात्रय आण्णा पडवळ यांनी दिलेला शब्द पाळला गावकऱ्यांनी त्यांचे मानले आभार
टाकवे बुद्रुक:
निवडणूक समोर येताच अनेक नेते आश्वासन देतात, निवडणूक झाली की दिलेले आश्वासन पळताना कित्येक नेते मात्र दिसत नाही .मात्र आंदर मावळातील एक नेता निवडणूक हारवुन ही जनतेला दिलेला शब्द वेळोवेळी पाळत आहे ,याचा प्रत्यय आंदर मावळ वासीय अनुभवत आहेत. अपयश हे कायमच नसते, अपयशाने खचून न जाता तो तरूण रात्रंदिवस जनतेसाठी पळतोय. कधी सुखात कधी दु:खात त्याची हजेरी आहेच. त्याच बरोबर निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्यावर त्याचा भर आहे.

या तरूणाने काही दिवसापूर्वी माळेगाव तळपेवाडी येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदीराकडे जाणार्‍या रस्ता करण्यासाठी जेसीबी मशीन देण्याचा शब्द दिला होता आणि तो त्याने पाळला. हा शब्द पाळणारा कोण अहो अस का विचारता,हा तरूण म्हणजे
दत्तात्रय पडवळ यांनी दिला होतो तो शब्द त्यांनी पुर्ण केला. त्या कामाचे उदघाटन मान्यवराच्या उपस्थितीत पार पडले, दरम्यान या आगोदर पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अपव्य खर्चाला फाटा देत अनसुटे येथील देविदास दामु एरंडे यांच्या घरावरील मोडकळीस आलेले पत्र बदलून नवीन पत्रे त्यांना टाकून दिले आहेत.

माळेगाव येथील रस्ताच्या उदघाटन प्रसंगी
तलाठी भाऊसाहेब राजू गावडे,शिवसेना विभागप्रमुख जयदासदादा ठाकर,मा.उपसरपंच सुनिलभाऊ ताते,पो.पाटील अंकुशदादा ठाकर,तंटामुक्ती अध्यक्ष सुरेशभाऊ आलम,मनसे विभागप्रमुख बबनदादा आलम,वि.का.सो.संचालक गणपतदादा ठाकर,सा.कार्यकर्ते अर्जुनभाऊ आलम,सा.कार्यकर्ते लक्ष्मण आलम,सा.कार्यकर्ते बजरंगदादा ठाकर,सा.कार्यकर्ते शांतारामभाऊ करवंदे,सा.कार्यकर्ते पंढरीनाथदादा आलम,सा.कार्यकर्ते दत्ताभाऊ ठाकर,सा.कार्यकर्ते राजूदादा पिंपरकर,सा.कार्यकर्ते अशोकदादा आलम युवा नेते सोपानभाऊ गोंटे, युवा नेते नारायणभाऊ थरकुडे व गावातील ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.

error: Content is protected !!