वडगाव मावळ:
न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा जामीन करण्यासाठी ५ लाखाच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस हवालदार यांना जिल्हा विशेष न्यायालयाने सोमवारी (दि.२२) जामीन मंजूर केला आहे. 
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांचा जामीन करण्यासाठी ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कामशेत पोलीस ठाणेच्या पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व कर्मचारी महेश दौंडकर यांना शनिवारी (दि.६) दुपारी ३:२५ वा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने रोख एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली होती. 

रविवारी (दि.७)जिल्हा विशेष न्यायालयाने या आरोपींना बुधवार (दि.१०) पर्यंत पोलीस कोठडी दिली त्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा बुधवारी (दि.१०) जिल्हा विशेष न्यायालयात हजर केले असता, आरोपींच्या गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली होती. . आरोपींना गुरुवारी (१८) रोजी न्यायालयात पुन्हा हजर केले असता, सोमवार (दि.२२) पर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ केली. सोमवारी (दि.२२) दुपारी हजर केले असता, जिल्हा न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी जामिनावर सुटका केली आहे.

error: Content is protected !!