वडगाव मावळ:
जल शपथ
जागतिक जल दिन,
मी, पाणी बचतीची व पाण्याचा विवेकी वापर करण्याची प्रतिज्ञा करत आहे. मी, पाण्याचा सुयोग्य वापर करण्याची प्रतिज्ञा देखील करीत आहे. तसेच मी, पाण्याचा थेंब अन थेंब साठवेन आणि “कॅच दरेन” या अभियानाच्या यशस्वितेसाठी संपूर्ण सहयोग देईन.
मी, पाण्याला एक अनमोल संपदा मानेन आणि असे समजूनच पाण्याचा वापर करेन, मी अशीही प्रतिज्ञा करत आहे की, मी माझे कुटुंबीय, मित्र आणि शेजाऱ्यांना पाण्याचा विवेकी वापर करण्याबाबत व पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत प्रेरित करेन.
तसेच त्यासाठी सर्व आवश्यक प्रयत्न करेन..ही वसुंधरा आपली आहे. आपणच या वसुंधरेला वाचवू शकतो आणि आपले भविष्य सुरक्षित करू शकतो. यासाठी मी देशाचा जलरक्षक म्हणून कायम कार्यरत राहण्याची शपथ घेत आहे.
ही शपथ घेतली मावळ तालुक्यातील भोयरे गावच्या महिलांनी, आणि त्यांना शपथ दिली ग्रामसेविका प्रमिला सुळके यांनी. निमित्त होते.
यावेळी सरपंच श्री.बळीराम राणु भोईरकर, उपसरपंच मंगला अडिवळे, ग्रामपंचायत सदस्या मीराबाई जांभूळकर, ग्रामसेवक प्रमिला सुळके ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर खुरसुले महिला ग्रामस्थ उपस्थित होते.