वडगाव मावळ बार असोसिएशनचे सचिव, पवळेवाडी येथील राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते अॅड. सोमनाथ सिताराम पवळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लिगल सेल (लॉयर्स फोरम) च्या मावळ तालुकाध्यक्ष पदी आज दिनांक २२/०३/२०२१ रोजीपासुन फेरनियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष बळकटीसाठी व मजबुत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय,
धोरणे व मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार मावळ तालुक्यातील सर्व वकील.बंधु व भगिनी तसेच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले सहकार्य राहिल असा विश्वास व्यक्त करीत.
तयार करून त्यास मान्यता घेवुन आपला कार्यभार सांभाळवयाचा आहे,असे निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष
अॅड. दिलीप काळुराम करंडे यांनी पवळे यांना दिले आहे. मावळचे आमदार सुनिल शेळके,पक्षाचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे नगरसेवक किशोर भेगडे याचयाह.अनेक मान्यवरांनी पवळे याचे अभिनंदन केले.