पवनानगर : आरोग्य सेवा हिच ईश्वर सेवा आहे, याला अनुसरून प्रत्येकाने कामाची गती वाढवून सर्वसामान्यांपर्यंत उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचावी असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी केले. येळसे तील बैठकीत मराठे बोलत होते.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करताना कामाची गती वाढवा असे त्यांनी सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायतीने आरोग्य सेवकासांठीजागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे असा सल्ला त्यांनी दिला.
जिल्हा परिषदेच्या सदस्या अलकाताई धानिवले यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत शासनाच्या आरोग्य योजनांपासून एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये अशा सूचना धानिवले यांनी दिल्या. सहा उपकेंद्रामध्ये डॉक्टर असून नागरिकांनी तेथे उपचारासाठी जाऊन जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे सुचवले. धानिवले यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या सभेत मागिल सभेचा सभावृत्तात वाचन करण्यात आ आला. राष्ट्रीय कार्यक्रमाचा आढावा घेऊन सन २०२०- २१ च्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समीतीवर नव्याने निवडून आलेल्या सरपंच सिमा ठाकर व संतोष जाधव याची नियुक्ती करण्यात आली.डॉ. चद्रकांत लोहारे म्हणाले “कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामिण भागातील प्रत्येकाने प्रतिबंधक लस घेणे गरजचे आहे.
आशा वर्कर्सने कोरोना संकटात चांगले काम चांगले केले, त्यात अनुषंगाने उमा शेळके यांचा सन्मान करण्यात आला जिल्हा आरोग्य विभागाने आशा वर्कर्स साठी स्वतंत्र कक्ष उभारण्याची मागणी ज्ञानेश्वर ठाकर यांनी केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य आलकाताई धानिवले,
पंचायत समिती सदस्य जिजाबाई पोटफोडे, डॉ चंद्रकांत
लोहारे, सरपंच सिमा ठाकर, ज्ञानेश्वर ठाकर, माजी सरपंच
शिवाजी सुतार, डॉ राजेंद्र मोहिते, माजी जिल्हा परिषद
सदस्य गुलाब वरघडे, मा.उपसरपंच नवनाथ ठाकर, गणेश
धानिवले, नामदेव पोटफोडे, संतोष जाधव, लिपीक विजय
ठाकर, वंदना कालेकर यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते

error: Content is protected !!