तळेगाव दाभाडे:
पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन मावळ तालुका अध्यक्षपदी तळेगाव दाभाडे येथील युवा उद्योजक अतुल गुलाबराव भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन
संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ द. चिंचवडे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन लाड,पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रविण मु-हे, तळेगाव शहर अध्यक्ष सोमनाथ त्रिंबके, मावळ तालुका कार्याध्यक्ष ॲड शैलेंद्र घारे उपस्थित होते. अतुल भेगडे म्हणाले, सर्वसामान्यांपर्यंत संघटनेचे विचार पोहचवून संघटना वाढीसाठी प्रयत्नशील राहीन. पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून एकमेकांत सामंजस्य पणा वाढीसाठी पुढाकार घेऊ.