वडगाव मावळ:
येथे मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने मराठ्यांची गौरव गाथा असलेल्या तीर्थ पानीपत येथील शौर्य माती पूजनाचा सोहळा श्रीमंत सरदार महादजी शिंदे छत्री येथे पार पडला.ग्रामीण जिल्हा अध्यक्ष नियुक्ती आणि कार्यकर्त्याची मार्गदर्शन बैठकही यावेळी झाली.
मावळ तालुका संपर्क अभिमानाचा शुभारंभ या निमित्ताने केला. महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष विकास निकम यांच्या हस्ते श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मावळ तालुका संपर्क प्रमुख ह.भ.प.सोमनाथ सावंत यांनी रेखाटलेली रांगोळी कार्यक्रमात आकर्षण ठरली.

शिवमुद्रा प्रतिष्ठाण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमित चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे आकर्षण वाढवले.या वेळी उपस्थितांन मध्ये संस्थापक अध्यक्ष अमित चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विकास निकम, वरिष्ठ आय टी विभाग प्रमुख माऊली दादा तौर, पुणे जिल्हा मोहीम विभाग प्रमुख तुषार गाडे पाटील, पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष राजीव काकडे ,नवनियुक्त जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोषदादा मराठे, पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष संतोष गोविंद साबळे,मावळ तालुका अध्यक्ष अमोल शंकर शिंदे,मावळ तालुका संपर्क प्रमुख सोमनाथ सावंत, राजगुरुनगर तालुका अध्यक्ष अमोल बाळासाहेब पाठारे,राजगुरुनगर कार्याध्यक्ष वैभव गावडे, मावळ तालुका मोहीम विभाग प्रमुख राजेश पाटील यांची भाषणे झाली.

मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान पुणे जिल्हा मोहीम विभाग प्रमुख तसेच संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या कन्या भागीरथी मातोश्री यांचे तेरावे वंशज तुषार गाडे पाटील यांच्या हस्ते पवित्र पानीपत मातीचे पुजन झाले. प्रस्तावना माऊली तौर यांनी केली, सुत्रसंचालन विकास निकम यानी केले. आभार राजीव काकडे यांनी मानले.

error: Content is protected !!