पुणे:
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त तेजस्वी सातपुते पोलिस अधिक्षक सोलापूर जिल्हा, मोक्षदा पाटील पोलिस अधिक्षक औरंगाबाद जिल्हा, प्रेरणा कट्टे सहाय्यक पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, यांना ‘ सामाजिक न्यायव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा’ 

 चैताली राजापुरकर वार्ताहर, झी. 24 तास न्युज यांना प्रसार माध्यम आणि सामाजिक क्षेत्र, विद्या येरवडेकर प्रधान निदेशक, सिम्बायोसिस सोसायटी, शिल्पा कोटकर सहसचिव, डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्था ,मोनिका गोळे प्रशिक्षक, शिवकालीन युध्दकला यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह व मानपत्र असे होते.

रविराज रघुनाथ साबळे कार्याध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य,
श्री. शरत शेट्टी उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य,अनघा साळवी उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ, महिला विभाग महाराष्ट्र राज्य
डॉ. वैदेही जंजाळे उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ, महिला विभाग, पुणे जिल्हा, विशाल डांगे सदस्य, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य, तुषार कापरे सदस्य, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य, विकास दंडवते उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ, पुणे जिल्हा उपस्थित होते.

error: Content is protected !!