वडगाव मावळ :
कान्हे येथील रेल्वेगेट जवळील मोकळ्या
जागेत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून
आला आहे. मृत्यूदेह पुरुषाचा असून अंदाजे ३५ ते ४०
वर्षांचा पुरुषाचा मृतदेह आहे. कान्हेचे पोलीस
पाटील शांताराम सातकर यांनी
वडगाव मावळ पोलीस ठाण्यात माहिती दिली.
या व्यक्तीच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा मळकट शर्ट आणि
पांढऱ्या रंगाची पॅन्ट आहे. याबत कोणाला माहिती
असल्यास वडगाव मावळ पोलीस ठाण्याशी संपर्क करावा
असे आवाहन पोलिसांनी केले आहे.