नवी दिल्ली :
सरकारी नोकर भरतीसाठी सप्टेंबरमध्ये
सीईटीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येईल,अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह दिली. या परीक्षेच्या नियोजनासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंजुरीने एनआरएची स्थापना करण्यात आली आहे. मनुष्यबळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सरकारी नोकरीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांसाठी सीईटी या वर्षी देशभरात आयोजित केली जाईल. ज्यामधून सरकारी नोकर भरतीसाठी उमेदवारांची निवड करता येणार असल्याची.माहिती पीटीआयशी बोलताना दिली.
सप्टेंबर २०२१ च्यादरम्यान या परीक्षा होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. जितेंद्र सिंह म्हणाले, डीओपीटीने केलेला हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्तीश: हस्तक्षेप केल्यानंतर आणि तरुणांबद्दल चिंता व्यक्त केल्यानं शक्य झाला आहे. एनआरए ही एक ही अशी संस्था असेल जी बी आणि सी वर्गातील पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी सीईटी परीक्षेचे आयोजन करणार.आहे.
सर्वात मोठा बदल यामध्ये असा आहे की, देशातील प्रत्येक.जिल्ह्यात किमान एक परीक्षा केंद्र असणार आहे. यामुळे.वेगवेगळ्या भागात दूर अंतरावर राहणाऱ्या उमेदवारांना.परीक्षेसाठी पोहोचणं शक्य होईल . महिला आणि दिव्यांग उमेदवारांसह आर्थिक.परिस्थिती नसलेल्या उमेदवारांनाही यामुळे फायदा होणार आहे.
आरोग्यमंत्री म्हणाले,बेजबाबदारपणा कारणीभूत
स्टाफ सिलेक्शन कमीशन, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल रिक्रूटमेंट बोर्ड्स सारख्या सध्याच्या केंद्रीय रिक्रूटमेंट एजन्सी त्यांच्या गरजेनुसार भरती करू शकतील. सीईटी फक्त नोकरीसाठी उमेदवारांच्या सुरुवातीच्या स्क्रीनिंगसाठी असणार आहे असंही राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.