वडगाव मावळ:
सरकारने बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा,अन्यथा बैलगाडा मालक रस्त्यावर उतरतील असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
मनसे शेतकरी सेनेचे अध्यक्ष पांडुरंग असवले,सचिव संजय शिंदे,उपाध्यक्ष निरंजन चव्हाण,विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अशोक कुटे,वाहतुक सेनेचे अध्यक्ष विशाल लोंढे,बबन आलम,विश्वनाथ असवले यांनी मावळच्या तहसीलदारांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
मावळातीलच शेतकऱ्यांच्या ईर्षेचा आणि प्रतिष्ठेचा बैलगाडा खेळ, सात वर्षापासून बंद आहे. प्राणीमित्र
संघटनेने याचिका दाखल केल्यावर बैलगाडा शर्यतीला
बंदी घातली. प्राणीमित्र संघटनेच्या आडमुठ्या वागण्याने शर्यती बंद आहेत.बैल शर्यतीत पळवणारा असो की,औताला आम्ही त्याला पोटच्या मुला सारखे संभाळतो. बैलांना गाजर,बीट,गव्हाची
कणीक,शेंगदाणा,खोबरे याची पेंड कधीकधी तूपही बैलांना पाजतो याकडे शासनाचे लक्ष वेधून आम्ही बैलांचे हाल कसे करतो .
स्वतःला प्राणीमित्र म्हणून घेणाऱ्यांनी जनावरे संभाळली आहेत का,त्याच्या घरी गोठा आहे का. आमच्या गोठ्यात फॅन आहे,बैलांना बसायला मॅट आहे. त्याची नियमित पणे आरोग्य तपासणी करतो. शर्यतीत धावताना बैलाला दम लागून त्याचा कधी मृत्यू झाल्याच्या
घटना घडल्यात का,अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती
केली.न्यायाच्या दालनात देर आहे लेकीन अंधार नही हे आम्ही ऐकल पण अजून कधी वर्षी आम्ही न्यायाची वाट पाहायची.
गावपातळीवरील यात्राजत्रा आणि उत्सवाला सुरूवात झाली आहे. बैलगाडा शर्यती सुरू झाल्या की यात्रेजत्रेत भेळ,रेवडी,आईस्क्रीम या पदार्थाची विक्री करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कित्येकांना यातून
रोजगार मिळतो,असेही मनसेचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!