नाशिक:

पोलिस असल्याची बतावणी करत मौल्यवान वस्तू लंपास करण्याची पद्धत नवीन नाही. इंदिरानगरात संशयितांशी हीच पद्धत वापरली थेट गांजा विक्रीची भीती घालण्यात आली. ‘इथे गांजा विक्री सुरू आहे. तुमचे दागिने व पैसे पिवशीत काढून ठेवा’ असे सांगत थेट ९९ हजारांचा ऐवज भामट्यांनी लंपास केला.

प्रकाश भगवान परब (वय ६७, रा. आशिष अपार्टमेंट) हे इंदिरनगरातील राजीवनगर येथील लक्ष्मी पीठ गिरणी समोरून दुपारच्या सुमारास जात होते. यावेळी ३० ते ३५ वयोगटातील दोन युवक मोटार सायकलवरून आले. त्यांनी प्रकाश परब यांना पोलिस असल्याची बतावणी केली. या परिसरात गांजा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तुमच्या जीविताला धोका होऊ शकतो, असे सांगण्यात आले. तुमच्याकडील सोन्याचे दागिने पिशवीत ठेवा, असे सांगतिले. ८४ हजाराची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची गोफ, त्यात ३ ग्रॅम वजनाचे पेन्डल, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा ऐवज परब यांनी पिशवीत ठेवला. तेवढ्यात भामट्यांनी पिशवी खेचत पोबारा केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक भामरे पुढील तपास करीत आहेत.

error: Content is protected !!