कामशेत,ता.१०:

 नाणे जवळील नवीन उकसानच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन स्थानिक गावक-यांचे हस्ते करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी पासून हा बंधारा नादुरूस्त होता.
त्याच्या दुरुस्तीच्या कामाला आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने ८९ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. 


कुंडलिका नदीवरील वडिवळे धरणातून विसर्ग करण्यात येतो.हा विसर्ग पुढे इंद्रायणी नदी पात्रातून नदीकाठच्या गावांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व बारमाही शेतीसाठी या पाण्याचा वापर केला जातो. या नदीवर पाणी अडवून ठेवण्यासाठी ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे
बांधण्यात आले आहेत.
त्यातील या बंधा-याची दुरावस्था झाली होती.त्यातून गळती होत असल्याने पाणी साचत नव्हते. त्यामुळे लगतच्या शेतीला पाणीपुरवठा करण्यास मोठी अडचण निर्माण होत होती. आमदार शेळके यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याने शेतीला.पाणी वापरा येईल असे,सुधीर आंद्रे यांनी सांगितले.


 

ग्रामपंचायत सदस्य संदीप आंद्रे, समीर आंद्रे, चारुशीला म्हाळसकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ आंद्रे, अमोल कोंडे, सोमनाथ बिनगुडे, सुधीर आंद्रे, शरद वाघुले, अमोल पवार नितीन शेलार, अंकुश बिनगुडे ,आकाश शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.
.
error: Content is protected !!