वडगाव मावळ :

  सहा महिन्याच्या लेकीसह सत्तावीस वर्षीय महिलेने आत्महत्या केली. आत्महत्येचे  कारण  समजू शकले नाही.राहत्या घरात पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. त्याच वेळी तिच्या सहा महिन्याच्या मुलीचा मृतदेह त्या ठिकाणी सापडला. 

ही घटना गुरुवारी(दि. ११)ला सकाळी ११ वाजता  ही घटना  घडली. वडगाव मावळ येथील जय मल्हार रेसिडेन्सी,खंडोबा मंदिराजवळ  येथे  ही घडली. रागिनी महेश दुधाणे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर श्रीशा महेश दुधाणे हे सहा महिन्याच्या मुलीचे नाव आहे.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  अज्ञात कारणासाठी विवाहित महिला रागिनी दुधाणे हिने राहत्या घरात पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सहा महिने वयाच्या श्रीशा दुधाणे हिचा मृतदेह सापडला.घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक शीला खोत, पोलीस हवालदार संतोष माने आदीनी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शीला खोत करीत आहे.


error: Content is protected !!