कामशेत :-

 जागतिक महिला दिनानिमित्त महावीर हास्पिटल यांच्या वतीने कोरोनाच्या काळात ज्या महिलांनी आरोग्य सेवा केली .त्या महिलांना कोरोना योद्धा धन्वंतरी पुरस्कार ने गौरविण्यात आले.
यावेळी यामध्ये महिला डॉक्टर, आशाताई, अंगणवाडी सेविका कामशेत, कान्हे वडगाव, कार्ला या परिसरातील महिलांचा सत्कार करण्यात आला.स्मिता सुतार,डाॅ. अश्लेषा दिघे,डाॅ. शितल लोंढे यांना धन्वंतरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सुनील कदम,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे,जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे,मंदाकिनी साबळेआदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले सन्मानपत्र गणेश ,मुर्ती प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजना मुथा यांनी केले. सूत्रसंचालन रामदास वाडेकर ,आभार डाॅक्टर विकेश मुथा यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन डाॅक्टर विकेश मुथा,गणेश भोकरे, वनिता वाघवले व महावीर हास्पिटल चे सर्व कर्मचारी यांनी केले.

error: Content is protected !!