वडगाव मावळ:

अटकेतील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी लाच स्वीकारणा-या कामशेतच्या पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस,निरीक्षक व कर्मचाऱ्याला
न्यायालयाने दहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शनिवारी दुपारी अटक करण्यात आलेल्या लाचखोर पोलीस अधिका-यांना अटक करण्यात आल्यावर पोलीस निरीक्षक,सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्याला आज वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. या कारवाईत वरिष्ठांचा सहभाग आहे का याचा तपास करणे बाकी असल्याचे आणि इतर कारणे सांगत पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती.
पोलीस निरीक्षक अरविंद दौलत चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल प्रभाकर कदम व त्यांचे कर्मचारी महेश विनायक दौंडकर
यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावर कामशेत
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे, सापळा
कारवाईत वरिष्ठांचा सहभाग आहे का, याबाबत तपास
करायचा आहे. तसेच यामध्ये आणखी कोणी साथीदार
आहे का, याचा तपास करायचा आहे. आरोपींच्या
आवाजाचे नमुने तपासकामी घेण्याचे बाकी आहे,
गुन्ह्यातील निष्पन्न साक्षीदारांचे जबाब नोंदवणे,
गुन्ह्याचा अधिक सखोल तपास करणे, या गुन्ह्यात
तक्रारदार याच्या मामावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या
छायांकित प्रती, या गुन्ह्याचे सबळ पुरावे हस्तगत करणे
बाकी आहे, या गुन्ह्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने तपास करण्यास वेळ
मिळालेला नाही, आरोपींच्या कार्यालयातून हजेरीपट व
इतर माहिती पुरावे घेणे बाकी असल्याने आरोपींना
पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयात करण्यात
आली आहे. न्यायालयाने आरोपींना दहा मार्चपर्यंत
पोलीस कोठडी सुनावली आहे.
error: Content is protected !!