•आंदर मावळ मधील रस्ते ठरतायत मृत्यू मार्ग•.
 •रिप्लेक्टर दिशादर्शकाचा अभाव•
 •बांधकाम विभागाचे दुर्लक्ष•.
टाकवे बुद्रुक औद्योगिक वसाहत  याठिकाणी कामानिमित्त येणारे नागरिक व शहरी भागाला जोडणारा हे दोन मुख्य रस्ते या रस्त्याने चाळीस ते बेचाळीस गावचे नागरिक या  रस्त्याने प्रवास करत असतात, आंदर मावळ मधील रस्त्यांना काहीच सुविधा नसल्यामुळे रस्ते बनत चालले आहे मृत्यूचे घर  मागील तीन महिन्यांपासून आत्तापर्यंत कान्हे फाटा खांडी ते सावळा या पट्ट्यामध्ये चार युवकांचा वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला.
 सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असणारे कान्हे फाटा ते सावळा – खांडी याठिकाणी रस्त्याला नागमोडी वळणे असल्यामुळे व रस्त्याच्या वळणावरती दिशादर्शक रिफ्लेक्टर नाही तसेच  रस्त्याच्या वळणावरती झाडे असल्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे अपघात होत आहेत अपघातांमध्ये बऱ्याच जणांना जीवाला मुकावे लागले तर लहान मोठे अपघात होऊन बरेच जण गंभीर जखमी झालेले आहेत . 
 चौकट
 मागील तीन महिन्यांमध्ये अपघात झालेल्या घटनेमध्ये  समीर कल्हाटकर (वय 30) व  आकाश आलम (वय 20) या   दोन युवकांची प्राण ज्योत मालवली, हि घटना ताजी असतानाच  मागील आठवड्यात स्वराज निकाळजे (वय 24) कान्हे फाटा येथील युवकाचा  टाकवे हद्दीत सकाळी  अपघात झाला तर त्याच दिवशी दुपारी  खांडी येथील  विशाल कोरडे (वय 22) ह्या युवकाचा त्याच्याच गावाशेजारी अपघात झाला. या झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये या चार युवकांना आपले प्राण गमवावे लागले.
चौकट 
टाकवे गावातील सरपंच उपसरपंचपद या विषयाची  झाडाला ठोकलेले खिळे व लिंबाची बातमी महाराष्ट्रभर गाजली ती घटना चुकीचीच होती त्या गोष्टीचा निषेध झालाच पाहिजेल.परंतु आज आपल्या हाता तोंडाशी आलेला घास असा हिरवला जातो. त्याची कोणालाच कळकळ लागु नये. हि घटना आपल्या घरात सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही. आंदर मावळातील  प्रत्येक घरातील व्यक्तींना आव्हान आहे. एकञ येऊन चांगले रस्ते, रस्त्याचे रुंदीकरण होणे,  रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरा  पट्टा,मोऱ्यांना सुरक्षा कठडे, वळणावरती गाडीचा स्पीड किती असावा, आपघात घडल्यास  काही किलोमीटरच्या अंतरावरती टोल फ्री क्रमांक असलेले असे  फलक,  रस्त्याच्या वळणावरती सुरक्षा कठाडे, रस्त्याच्या दोनी बाजूने मुरमीकरण करून साईट पट्ट्याची कामे होणे हे सर्व  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाले पाहिजे या सर्व मागण्यासाठी आंदर मावळ मधील नागरिक एकत्रित येऊन पुढील कार्यवाहीसाठी शासकीय अधिकारी व आमदार – खासदार यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे अशी माहिती 
सामाजिक कार्यकर्ते 
बबन आलम यांनी दिली आहे.
कान्हे  फाटा ते टाकवे  या रस्त्याची रुंदीकरनाची मंजुरी आहे रुंदीकरण झाल्यानंतर या रस्त्याच्या दोन्ही बाजूने ऐज  पेंटिंग (सफेद पट्टा )केली जाईल. व सर्वप्रकारचे सूचना फलक लावण्यात येईल, तसेच टाकवे सावळा खांडी वडेश्वर फळणे. या रस्त्यांना दिशादर्शक, वळणावरती सुरक्षा कठडे, रिफ्लेक्टर, टोल फ्री क्रमांक या सर्वप्रकारचे सूचनाफलक  ऐज पेंटिंग या सर्व गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून तातडीने काम हाती घेण्यात येईल , तसेच रस्त्याला जे अपघात होत आहेत त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर मृत्यू होत आहे. टू व्हीलर चालवताना रस्त्याच्या परिस्थितीनुसार स्पीड हा आटोक्यात असला पाहिजे  रस्त्याला नागमोडी वळणे असल्यामुळे गाडीचा स्पीड हा तीस ते पस्तीस पर्यंत पाहिजेल किंवा त्यापेक्षाही कमी असला पाहिजेल, आपला स्वतःचा जीव वाचला पाहिजेल त्यासाठी आरटीओचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे, मुख्यतः टू व्हीलर चालवताना हेल्मेट वापरले पाहिजे. कारण अपघात झाल्यावरती  डोक्याला गंभीर दुखापत होणार नाही त्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला जाईल. 
सर्वजनिक बांधकाम वडगाव मावळ  
शाखा अभियंता नंदकुमार खोत.
error: Content is protected !!