वडगाव मावळ:
त्यांची पाटीलकीची पाचवी पिढी. पिढ्यानपिढ्या पाटीलकीचा वारसा सांभाळणारे पंचक्रोशीतील त्याचे दमदार घराणे. या घराण्याच्या नावलौकिकासाठी ती राबली. कित्येक दू:खाच्या प्रसंगात ती खंबीरपणे उभी राहिली. तिच्या प्रेम्ळ,सुस्वभावी वागण्यातून,बोलण्यातून कुटूंबाचा एकसंघ पणा कायमच आनंदी राहिला. 

ती माहेराहून येताना कधी पायपीट करीत यायची,कधी बैलगाडीतून, तिने जात्यावर दळण दळले. उखळात कांडण केले. ती पाटीलच्या सुनेला शोभेल अशीच थाटामाटात राहिली,तिने कष्टाला आपल केले. ती अडाणी अशिक्षित पण तिने प्रपंच नेटाचा आणि उत्तम केला. तिच्या नावातच लक्ष्मी असल्याने. ती गायकवाड पाटील घराची गृहलक्ष्मी ठरली. लक्ष्मीबाई मधुकर गायकवाड रा. काब्रे मावळ असे या मातेचे नाव. पायपीट करीत माहेराहून येणारी,कधी बैलगाडीतून येणारी लक्ष्मीबाई आज अलिशान मोटार कारने माहेरी जाते. गायकवाड पाटील कुटूंबाला पाच पिढ्यांचा पाटीलकीचा वारसा आहे.
 १९६०च्या दशकात ४५ माणसांचा एकत्र कुटूंब होते. सखये कोण आणि चुलत कोण याचा भेदभाव येथे कधीच झाला नाही. आपल्या पणाने वागणा-या कुटूंबातील त्या पिढीतील थोरली सूनबाई म्हणजे लक्ष्मीबाई मधुकर गायकवाड पाटील. त्याचे माहेर टाकवे बुद्रुक किसन कोंडे व पार्वताबाई कोंडे यांची ही कन्या. कै.मारूती सबाजी गायकवाड व 

ऋषीबाई मारूती गायकवाड यांची सून होऊन टाकवे वरून कांब्रेत आल्या. सासरी पाटीलकी असल्याने आपसूकच पैलवान की होतीच.पैलवानकीच्या  नावात सासरे काशीीना व दीर शिवाजी व सोपाान सरस यांची  नाव तालुका भर होतच. नव्हे नव्हे भोसरी,चिंचवड,पुणेतील पैलवानाला ही नावे माहित होती. सासरे विश्वनाथ व किसन शेतीत रााबणरे हाडाचे शेतकरी होते. 
घरदार मातीचे असले तरी टुमदार होते. दही दुभत्याने घर भरलेले होते. विहीरीच्या मोटंच पाणी शिवारात फिरत होते. पण दळणकाडण थोरल्या सूनबाई म्हणून जात्यावरच त्यात करीत होत्या. घरात राबता असायचा तस वावरात कष्टही त्या करायच्या. काळ कोणासाठी थांबत नाही,तसा याही परिवारासाठी थांबला नाही. पुढच्या पिढी सहा भावंड मोठी झाली,तीही कष्टच करू लागली .मोटचं पाणी खळळले.
शेती ओलिता खाली आली. घरादारातील माणस राबवू शेती पिकवू लागली. कौलारू घराची जागा सिमेंट च्या घराने घेतली. सारवण संपले फरशी आली. पायी बैलगाडीत जाणारी माऊली चारचाकी वाहनातून जाऊ लागली. अशिक्षित अडाणी आईचे लेकर शिकली. मुली शिकल्या. सूना गॅजुएट झालेल्या मिळाल्या. नातवंडं
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकू लागली .सुख सुख कशाला म्हणायचं ते यालाच. दु:खाचे अनेक डोंगर अंगावर झेलून हे कुटूंब आज ताठ मानेने समाजात मिरवत त्यात या आईचा सिंहाचा वाटा आहे.
 त्याचा मुलगा साईनाथ गावचा सरपंच होता. गावची पाटीलकी संभाळता या घराने सरपंच पदाची उची वाढवली. आजच्या लेकीसूनानी आदर्श घ्यावा या मातेचा,तो तिच्या सुस्वभावी स्वभावाचा. प्रत्येकाला आपुलकीने राहण्यचा  
साईनाथ, सबाजी,मणिषा व सुरेखा या बहिण भावंडांच्या नात्याची वीण त्यांनीच घट्ट गुंफली आहे. तर 
धाकटया जाऊबाई भारती गायकवाड गावच्या पोलीस पाटील आहेत. 
error: Content is protected !!