कामशेत,ता.५:

 श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रूरबन योजनेतील रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्या अंजना मुथा,शिवसनेचे तालुका उपप्रमुख विकेश मुथा,शिवसनेचे माजी शहराध्यक्ष गणेश भोकरे यांनी केली. खडकाळा ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना या आशयाचे निवेदन देऊन या रेंगाळलेल्या काम सुरू करण्या बाबतीत मागणी केली आहे. मागील वर्षी सुरू झालेले काम काही अडचणी मुळे रखडले ही वस्तूस्थिती असली तर बंदिस्त गटार योजनेच्या रेंगाळलेल्या कामाचा स्थानिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.
 अंजना मुथा म्हणाल्या,” गावठाण परिसरात गटाराचे पाणी साचल्याने मच्छरांची पैदास वाढली आहे, गटारांचे पाणी गावठाणाजवळील शेतीत गेल्याने सुमारे चाळीस एकर जमीन नापीक झाली आहे,प्रशासनाने या कामाला प्राधान्य देऊन हे काम तातडीने मार्गी लावावे.
ग्रामविकास अधिकारी जगजीवन मोढोरिया म्हणाले,ग्रामपंचायतींच्या मासिक बैठकीत या बाबतीत चर्चा करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. 

error: Content is protected !!