येथील सामजिक कार्यकर्ते
आणि प्रसिद्ध व्याख्याते
विवेक गोविंदराव गुरव यांना
कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने
राष्ट्रीय कलारत्न
पुरस्काराने गौरविण्यात आले.
संत गाडगे महाराज यांच्या जंयतीचे औचित्य साधून
हा पुरस्कार देण्यात आला.
कोल्हापूर येथील शाहू महाराज स्मारक भवनात करवीर तालुका सभापती मनिषा भगवान पाटील यांच्या हस्ते गुरव यांना सन्मानीत करण्यात आले.यावेळी संस्थेचे संस्थापक उदयसिंग पाटील ,कोल्हापूर जिल्हा वारकरी
संप्रदायाचे अध्यक्ष हभप नाळे महाराज यांच्यासह
संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
विवेक गुरव यांनी व्यक्तिमत्व विकास आणि
विविध विषयांवर राज्यभर व्याख्याने देवून जनजागृती केली आहे.त्यांच्या कार्याची
दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.
या पुरस्काराबद्दल
मावळ तालुक्यात विवेक गुरव यांचे कौतुक होत आहे.
यापूर्वीही गुरव यांना विविध नामांकित संस्थांचा
तीनवेळा राज्यस्तरीय पुरस्कार
मिळाला
आहे.