वडगाव मावळ

करंजगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी दिपाली साबळे आणि उपसरपंच पदी नवनाथ ठाकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
करंजगाव करांनी गावचे गावपण जपत पक्ष विराहित निवडणुकीचा पायंडा घालून दिला. मावळात सुरू असलेल्या भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील श्रेयवादाच्या लढाईत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीआहे.निवडणूक अधिकारी मुकुंद खोमणे व तलाठी मनिषा यादव यांनी काम पाहिले.
ग्रामपंचयात सदस्य वैशाली कुटे, ममता गवारी, महादू शेडगे, उज्ज्वला पोटफोडे, कौशल्या पवार उपस्थितीत होते. ग्रामस्थांनी समर्थकांसह भंडाऱ्याचीउधळण करत जल्लोष साजरा केला. 

करंजगाव, साबळेवाडी, पाले, मोरमारवाडी, ब्राह्मणवाडी या गावांचा आणि वाडया वस्त्यांचा ग्रामपंचायतीत समावेश होतो. सरपंच दिपाली साबळे म्हणाल्या,पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन गावक-यांनी ही संधी दिली आहे. गावातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेईल.
उपसरपंच नवनाथ ठाकर म्हणाले,मागील दहा वर्षापूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणून केलेल्या कामाचा अनुभव पाठीशी आहे. यंदा सगळ्यांच्या पाठिंब्यावर मिळालेल्या संधीचा सदुपयोग गावच्या विकासासाठी करीन. सार्वजनिक आणि वैयक्तिक योजना राबविण्यावर भर असणार आहे. 

error: Content is protected !!