वडगाव मावळ :
गाडी चालविण्याच्या किरकोळ कारणावरून जांभूळ रेल्वे गेटमध्ये (ता. १९ जानेवारी २०२१) ला सायंकाळी सात वाजता तिघांना लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केली होती. यातील गंभीर जखमी शुभम विलास डोंगरे (वय २७, रा. लोणावळा) यांचाउपचारदरम्यान शुक्रवारी (दि.२६) सकाळी १० वा. मृत्यू झाला. याप्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
भारती विलास डोंगरे (वय ४५, रा.लोणावळा) यांनी फिर्याद दिली होती. याप्रकरणी वडगाव पोलिसांनी सुनिल शंकरराव शिंदे, सतीश शंकरराव शिंदे (रा. तळेगाव दाभाडे), बबन दगडू शिंदे (रा. कुसवली), बाळू मारुती गोसावी (रा. कुंभारवाडा, वडगाव), क्रषिकेश सुरेश शिंदे (रा. तळेगाव दाभाडे), सुभाष खांडभोर (रा. नागाथली) यांना अटक केली आहे. सध्या सर्व जण येरवडा कारागृहात आहेत. या प्रकरणातील पंकज खांडभोर, सुरेश देशमुख, शंकर अनंतराव शिंदे हे फरार आहेत.वडगाव मावळ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी चालविण्याच्या किरकोळ कारणावरून शुभम विलास डोंगरे, भारती विलास डोंगरे,
प्रशांत विलास डोंगरे या एकाच कुटुंबातील तिघांना आरोपींनी मारहाण केली होती. यामध्ये शुभम हा गंभीर
जमखी झाला होता. त्याच्यावर सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. डोक्यात गंभीर जखम झाल्याने तो बेशुद्धावस्थेत होता.
उपचारादरम्यान शुक्रवारी (दि.२६) सकाळी १० वा. शुभमचा मृत्यू झाला.पोलिसांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.