टाकवे बुद्रुक: 

घोणशेत जवळच्या लंकेवाडीत अंतर्गत रस्ता या रस्त्याचा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागणार आहे, विद्यार्थी दुग्धव्यवसाय कामगार नागरिक यांची गैरसोय टळणार आहे.या रस्त्याचा प्रश्न गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित होता जाणे – येणे खूपच अवघड होते.पावसाळ्यामध्ये गाड्या मुख्य रस्त्यालाच लावून घरापर्यंत पायपीट करीत जावे लागत असे. येथील नागरिकांचे हाल कमी व्हावेत
यासाठी जिल्हा परिषद सदस्य नितिन मराठे यांच्या प्रयत्नातून व माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या २५१५ फंडातून १० लाख रुपये निधी मंजूर झाला.
जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, माजी उपसभापती शांताराम कदम, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, वडगाव नगरपंचायत गटनेते दिनेश ढोरे, सरपंच नीलेश शिंदे, शंकर खंडागळे, ठेकेदार आदित्य भोसले, ग्रा.प.सदस्य योगेश चोरघे ,शशिकांत लंके,राजेंद्र लंके, नवनाथ खरमारे, रमेश लंके व ग्रामस्थांच्या उपस्थित भूमीपूजन करण्यात आले. माजी ग्रामपंचायत सदस्य श्याम चोरघे यांनी प्रास्ताविक केले .शशिकांत लंके यांनी आभार व्यक्त केले.
विकास कामे चालू राहणार आहेत ,सर्व ग्रामस्थानी एकत्र येवून विकास कामे पार पडण्यासाठी सहकार्य करावे .रस्त्याच्या कामासाठी निधी कमी पडल्यास जिल्हा परिषद पंडातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठी यांनी .दिले 

error: Content is protected !!