वडगाव मावळ :

शिरदे ग्रुप ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने  झेंडा फडकावला असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला.तीस  वर्ष  भाजपची सत्ता असलेला बालेकिल्ला  खेचून आणण्यात यश आल्याचे पॅनल प्रमुखांनी सांगितले.

सरपंच पदी सुशीला दिलीप बगाड व उपसरपंचपदी सुरेखा सचिन ठाकर  यांची निवड करण्यात आली. उपसरपंच पदासाठी सुरेखा ठाकर व अरुण कुटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते,ठाकर व कुटे यांच्यात झालेल्या निवडणुकीत ठाकर यांचा एक मताधिक्य मिळवून विजय झाला. 

सदस्य सुरेश बगाड, बाळासाहेब सुतार, प्रांजली सुनील कदम, कांताबाई भरत कदम यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

रामभाऊ माने,उमेश पवार, किरण ठाकर, दिलीपभाऊ बगाड, सुरेश कदम, सचिन ठाकर ,सुनिल कदम ,दिनेश आप्पा शिंदे ,तुषार शिंदे यांच्यासह अन्य गावक-यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली. विजयी उमेदवारांनी भंडारा गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढली. शिरदे ग्रामपंचायतीवर महिला राज आले. शिरदे,सोमवडी,थोरण आणि जांभवली या गावांचा या ग्रामपंचायतीत समावेश होतो. 

error: Content is protected !!