वडगाव मावळ:

वडगाव कातवी सन १९६१ ते २०१८ परत ग्रुप ग्रामपंचायत होती. २०१८ साली त्याचे वर्गीकरण नगरपंचायत मध्ये करण्यात आले. कातवी गावचा रस्त्याचा प्रश्न, स्मशानभूमी, अंतर्गत गटारे ,आरोग्यसेवा पाणी फिल्टर अशी अनेक कामे नगरपंचायत असूनही कातवी मध्ये झालेली नाही. 

 कातवी ग्रामस्थांनी तहसील कार्यालय तसेच  मुख्याधिकारी वडगाव नगरपंचायत यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देऊन ही पूर्ण एकही काम पूर्ण केलेले नाही.

 अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे का  ग्रामस्थांनी विचार करून स्वखर्चाने आज रस्त्याचे काम मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात पूर्ण केले.

2014 ते 15 मध्ये गावातील डांबरीकरण रोड टाटा हाउसिंग सोसायटी यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी खोदकाम करण्यात आले.  रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला. त्याही वेळेला ग्रामस्थाने ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती.


त्यावेळेला सरपंच उपसरपंच यांनी आश्वासन दिले होते की ,आठ दिवसात रस्ता दुरुस्त करून देऊ पण यातील एकही दुरुस्ती किंवा इतर काही कामे झालेली नाही. पंचक्रोशीत असे एकमेव गाव असेल की त्या गावाला स्मशानभूमी अंतर्गत गटारे रस्ता पाणी फिटर आशा अनेक सुविधा उपलब्ध नाहीत .हा अन्याय  कातवी गावा वरती का केला जातो, याचे उत्तर आत्ता ग्रामस्थांना हवे कातवी गाव हे तळेगाव एमआयडीसी ला जोडून आहे.

तळेगाव एमआयडीसी ची सुरुवात ही कातवी गावापासून होते मग तरीही हे गाव विकासापासून वंचित का हा प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत आहे .या ठिकाणी अर्बन लाईफ ( vtp) व्यासकोन गूडलाइफ आयुष पार्क असे अनेक गृह प्रकल्प या गावांमध्ये वसलेले आहेत ,याचा सीआरसी फंड कोठे वापरला जातो याचे उत्तरे ग्रामस्थांना अपेक्षित आहे. गावक-यांनी स्वखर्चाने रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले.

error: Content is protected !!